
व्यसनमुक्ती
व्यसनी लोकांच्यामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेले आपणास दिसून येतात या वर कोणीतरी उपाय काढणे गरजेचे आहे म्हणून आधार फौंडेशन रूकडी यांनी या वर एक व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
आपल्या देशा समोरील सर्वात मोठे संकट म्हणजे व्यसनाधीनता हे आहे. कारण भारत देश हा 70 टक्के तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो पण त्यापैकी बहुतांश तरूण विविध व्यसनांच्या अहारी गेलेले दिसून येतात . अशा व्यसनी लोकांच्यामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेले आपणास दिसून येतात या वर कोणीतरी उपाय काढणे गरजेचे आहे. संदिप बनकर यांनी या वर एक व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
जे लोक व्यसनी आहेत त्यांच्या वर काम करून आपली शक्ती वाया न घालवता जे लोक या व्यसनांच्या मार्गावर जाणार आहेत त्यांना जर योग्य मार्गदशन किंवा प्रबोधन केले तर आपला देश या व्यसनांच्या विळख्यात जाणार नाही असा विचार करुन संदिप बनकर व त्यांचे सहकारी श्री. राहूल चव्हाण , प्रशांत पाटील , सचिन चव्हाण डॉ. राम चट्टे यांनी एक कार्यक्रम आखला व्यसनांच्या आहारी जाऊन ज्या लोकांना कर्करोग झाला आहे. आज आपल्या संपूर्ण देशासमोर एक फाार मोठे संकट येऊन ठाकले आहे आणि ते म्हाणे व्यसनांचे आपला देश तरुणांचा देश म्हाणू न ओळखला जातो पण या तरुणांच्या देशात किती तरूण समाजाच्या हिताचे काम करत आहेत याचा विचार केला तर खरच आपला देश तरुणांचा देश आहे का असा प्रश्न् पडता कारण आपल्या देशातील तरुणाई या आमली पदार्थाच्या भोव-यात आडकलेली दिसत आहे आज देशात या व्यसनांमुळे मरणा-यांची संख्या पाहीली तर आपल्याला या आमली पदार्थानी आपला देश किती पेाखरला आहे याची जाणीव होईल. आणि आपल्या समाजातील तरुण याव्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडणे खुप महत्वाचे आहे हे जाणून .










अशा लोकांचे फोटो व व्हिडीओ एकत्र करून त्याची एकध्वनी चित्रफीत तयार करून आपल्या आजुबाजूच्या प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात जाऊन 8 वीते 12 वी पर्यत च्या मुलांना ती ध्वनी चित्रफीत दाखवून व्यसनांचा आपल्या शरीरावर होणारे परीणाम व त्यामुळे आपल्या कुटूंबावर व पुढेजाउुन आपल्या देशावर त्याचे किती वाईट परीणाम होत आहेत हे समजावुन सांगतले जातात . प्रत्येक वर्षी किमांन 50 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला जातो. यामुळे अनेक मुलांनी या व्यसनाच्या आहारी न जाण्याचा निश्चय ही बोलून दाखवला आहे.याबाबत काही तरी प्रबाधन केले पाहीजे असा विचार करुन पंचक्रोशीतील प्रत्येक शाळेत व्यसनमुकती चे प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने आयोजीत केली तसेच व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परीणाम चित्ररुपात दाखवणारे पोश्टर प्रत्येक शाळेत ,कॉलेज तसेच गावातील महत्वाच्या ठिाकणी लावण्यात आले . व्यसन मुक्तीची जाणीव जागृती करण्याचा उपक्रम राबवण्यात आले