ABOUT US

आमच्याबद्दल

आधार फौंडेशन रुकडी

“कर्मण्येवादीकारस्तु माफलेशू कदाचन”

या उक्तीप्रमाणे कार्य करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा  न करता प्रमाणिकपणे समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याच्या हेतुने प्रेरीत होऊन ज्या मुलांना शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असते पण परीस्थितीसमेार हतबल होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासुन दूर गेलेल्या मुलांसाठी काही तरी करण्याची इच्छा उराशि बाळगुन श्री.संदिप बनकर यांनी आपले कार्य सुरू केले .

पण हे काम एकट्याने केले तर ते सिमीत राहील आणि या कामात इतरानांही सहभागी करून घेतले तर आपणास जास्तीत जास्त मुलांना मदत करता येईल या भावनेतुन श्री.संदिप बनकर यांनी आपल्या कांही मित्रांना हा विचार सांगीतला आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद ही दिला आणि 23/07/2007 रोजी आधार फौंडेशन रुकडी नावांने एक सेवाभावी संस्था सुरू झाली . संस्था सुरू करताना एक तत्व सर्वानी पाळलेते म्हणेजे संस्थेत जात, धर्म आणि राजकारण या गोष्टींना बिलकुल थारा द्यायचा नाही. कारण गरीबीला कोणताही धर्म नसतो वा कोणतीही जात नसते .शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता ज्या समाजाने आपणास मोठे केले पद, प्रतिष्ठा दिली त्या समाजाचे आपण काहि तरी देणे लागतेा आणि हे ऋण आपण या जन्मीच फेडले पाहीजेत यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील कांही भाग किंवा किमान 100 रुपये समाजातील उपेक्ष‍ित लोकांसाठी दिला पाहीजे या भावनेने निधी गोळा करण्यास सुरूवात केली . जमा झालेल्या निधीतुन गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना निरपेक्ष भावनेने शैक्षणिक साहित्याची मदत , शाळेची फी , शाळा बाहय परीक्षांना बसण्याची ईच्छा असणा-या मुलांना परीक्षा फी , टायपींग, एम.एस.सी.आयटी ची परीक्षा देणा-या मुलांनी परीक्षा फी अशापद्धतीने मदत देण्यापासुन सुरूवात झाली . आज अखेर आाधार फौंडेशन रुकडीच्या माध्यमातुन 800 मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात आली आहे .त्यापैकी कांही मुले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत .कांही मुले आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संस्थेस हातभार लावत आहेत. जसजसे संस्थेची कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील विविध भागात काम करत असताना समाजातील लोकांना असणा-या अनेक अडचणी व अनेक दुख: समोर येऊ लागली आणि ती दुर करण्याचा प्रंयत्न संदिप बनकर यांनी आधार फौंडेशनच्या माध्यमातून केला आहे .

आम्हाला का निवडा?

आमची टीम

Aadhar Foundation-Rukadi has started journey to serve society honestly and sincerely without wanting to return. His aim is to serve the organisation, to help the economically poor children

संदिप राजाराम बनकर

अध्यक्ष

प्रशांत महावीर पाटील

उपाध्यक्ष

शांतीनाथ पाटील

संचालक

सचिन राजाराम बनकर

संचालक

सचिन चव्हाण

संचालक

विशाल शिवाजी तेली

सेक्रेटरी

अमोल आनंदराव मोरे

खजानिस