education help

शैक्षणीकमदत

चंगळवाद भोगवाद, आणि मौज मजेच्या विविध कार्यक्रमातुन स्वता:च्या कौंटूंबीक आनंदाच्या स्वास्थ्याच्या आणि भौतीक सुखाच्या मागे लागून सामाजिक भान विसरणारेच आसपास सर्वत्र चित्र दिसत असताना त्या प्रवाहात सहभागी न होता स्वता:च्या कष्टातुन मिळविलेल्या उत्पन्नातून गरीब आणि निराधारांना आधार देऊन त्यांच्या करीयरला उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे .अनाथ दारिद्र रेषेखाली, मोल मजुरी करणारे धुनी भांडी करुन कुटूंब चालविण्या-या महीलांच्या अपंग आणि असहाय्य्‍ कुटूंबातील मुला मुलींना आर्थिक आधार देण्याचे काम या संस्थेने केले आहे .

आपण ज्या कष्टातून मार्ग काढला पण आपल्याबरोबर अनेक मित्रांना केवळ अर्थिक आधार न मिळाल्यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाला आर्ध्या वाटेवरच सोडावे लागले गुणवत्ता असूनही काही जनांना केवळ आर्थिक मदत न मिळाल्यामुळे आपले ध्येय गाठता आले नाही हे आजुबाजूचे अनुभव पाहुन तसेच आपणासही आपल्या शैक्षणिक जीवनात असा आधार मिळााला असता तर आपणही वेगळे कांही तरी करुन दाखविले असते याची मनोमनी खात्री पटल्यामुळे हया संस्थेच्या सभासदांनी आधार फौंडेशनची कल्पना उचलुन धरली आपल्या अल्पशा आर्थिक आधाराने जर एखदया विद्यार्थ्याचे रखडलेला शिक्षण प्रवास मार्गी लावला तर त्या सारखे मानसिक समाधान नाही जर अश्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहीले तर अशि मुले पाटाची खळगी भरण्यासाटी गवंडी काम किंवा कापड दुकान यासारखी कामे निवडतात कालांतराने व्यसनाच्या अहारी जातात व त्याच्या आयुष्याचा मार्गच चुकता आणि तोही कायमचा मग ती मुले परत कधीच चांगल्या मार्गावर येत नाही अशाचा 125 मुलांना शिक्षण पुर्ण करण्यासाठी आधार फौंडेशन रुकडी ने यथाशक्ती गणवेश वहया पूस्तके , पेन सॅक तसेच परीक्षा फी भरून मदत केली आहे.