VRUKSHAROPAN

वृक्षारोपण

आधार फौंडेशन रूकडी यांनी एक स्वयंसेवकांचे एक चांगले संघटन केले आहे. दर रविवारी “एक तास समाजासाठी ” हा उपक्रम राबवला आहे.

आज ग्लोबल वॉर्मीग चा खूपच वाईट परीणाम संपूर्ण जगावर झालेला दिसून येत आहे . अफाट प्रमाणावर झालेली वृक्षतोड आणि त्यामुळे पृथ्वीचे वाढलेले तापमान यामुळे संपूर्णसजीव सृष्टी धोक्यात आली आहे. यावर एकच उपाय आहे. मोठया प्रमाणात वृक्षलागवड होणे गरजेचे आहे .नुसती वृक्ष लागवड न होता त्या वृक्षांचे संगोपनही होणे तितके च गरजेचे आहे .आणि हा विडा संदिप बनकर व त्यांचे सर्व सहकारीयांनी उचलला आहे. 2009 साला पासून संदिप बनकर यांनी आपल्या गावातील रुकडी अतिग्रे रोडवर वृक्षरोपण केले पण यावेळी मात्र बाकीच्या ठिकाणी जसे होते तसे नाही झाले कित्येक ठिकाणी दरवर्षी वृक्षारोपन होते पण खेड्डे तेच असतात असे न करता आधार फौंडेशनने लावलेल्या झाडांचे संगोपन केले जाते. या साठी आधार फौंडेशन रूकडी यांनी एक स्वयंसेवकांचे एक चांगले संघटन केले आहे. दर रविवारी “एक तास समाजासाठी ” हा उपक्रम राबवला आहे. कॉलेजमध्ये व शाळेमध्ये शिकणरी मुले प्रत्येक रवीवार सुट्टी असल्या मुळे सकाळी लवकर उठत नाहीत अशा मुलांना आपल्या झोपेतील वेळेचा एक तास समाजासाठी व निसर्गासाठी देण्यासाठी तयार करुन जवळ जवळ 50 हून अधिक मुले या उपक्रमात उस्फूर्तपणे व निरपेक्ष भावनेने सामील झाली आहेत. या एक तासात ग्रामस्वच्छता अभियान तसेच झाडांना अळीकरणे , पाणी घालणे काठया बांधणे या सारखी कामे मुले अगदी आनंदाने करतात .

आधार फौंडेशन रूकडीच्या माध्यमातुन जवळज वळ 8000 हजार हुन अधिक देशी व विदेशी झाडांची लागवड केली आहे. दरवर्षी किमान 500 ते 800 झाडे लवाली जातात व ती जगवली जातात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडांना जनावरांचा खूप त्रास आहे. अशा ठिकाणी झाडांना ट्रिगार्ड लावण अत्यंत गरजेचे होते. पण ट्री गार्डचा खर्च खुप होता . हा खर्च न परवडणारा होता अशा वेळी संदिप बनकर यांनी गांवातील दानशूर व्यक्तींना त्यांचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवसाचे औचित्य साधून किमान एक ट्री गार्ड किंवा दोन व्यक्तीच्या मध्ये एक ट्रीगार्ड देण्याचे अवाहन केले आणि बघता बघता 1200 रुपयांचे एक असे 65 ट्री गार्ड मिळाले यामुळे अतिग्रे रोडवरील सर्व झाडे जगवण्यात यश आले .

सुरवातीला झाडांना बादलीने पाणी घालत होते पण झाडांची संख्या वाढल्यावर बादलीने पाणी घालणे अशक्य होते मग ग्रामपंचायतीचा टँकर व्दारे झाडांना पाणी घातले जाऊ लागले . पण गाव मोठे असल्यामुळे गावात रोज कांही ना कांही तरी कार्यक्रम असल्याने ग्रामपंचायतीचा टँकर मिळत नसे त्यामुळे झाडांना वेळेत पाणी घालणे अशक्य होत होते त्यामुळे संदिप बनकर यांनी लोकवर्गणीतुन एक 5000 लिटर चा टँकर व ट्रॅक्टर 30/06/2019 रोजी घेतला आहे त्यामुळे झाडांना पाणी घालणे अत्यंत सोयीचे झाले आहे . संदिप बनकर यांनी रेल्वेस्टेशन च्या उत्तरेस ऑक्सीजन पार्कची निर्मीती करण्याचा मानस केला आहे गेल्या तीन वर्षात 3500 देशीव 55 हुन अधिक देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली आहे. व त्यांचे संगोपनही केले आहे .आधार फौंडेशनने आजपर्यंत 8000 झाडे जगवली आहेत व 10000 हुन अधिक झाडाचे वाटप केले आहे. आधार फौंडेशन मार्फत गावंतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्त्कार असो किंवा कोणता ही कार्यक्रम असो हार तुरे यांवर खर्च न करता एक देशी प्रजाती चे झाड लोकांना भेट स्वरुपात दिले जाते.