
रुग्णवाहिका सेवा
सर्वानांच चांगले आरोग्य लाभायला पाहिजे.पण परिस्थिती ने ते सगळयांनाच लाभेल असे नाही म्हणून आधार फौंडेशन मार्फत समाजातील सर्व घटकांसाठी आरोग्य मेळावे आयोजित केले जातात.
नमस्कार* कृपया खालील माहिती काळजीपूर्वक वाचा व योग्य वाटले तर सहकार्य करा 🙏🙏 सध्या रुकडी, अत्तिग्रे,चोकाक , मुडशिंगी या आपल्या गावांची लोकसंख्या जवळपास 50,000 च्या घरात आहे. आपल्या गावात कितेक वेळा अपघात होतात ,कित्येक लोकांना वैद्यकीय सेवेसाठी तातडीने कोल्हापूर,मिरज या सारख्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये घेवून जावे लागते. त्याकरिता आपल्या या पंचक्रोशीत 🚑🚑 रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार होत नाहीत. त्यामुळे कितेकाना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आधार फाउंडेशन रुकडी मार्फत माफक दरात🚑 रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचा मानस केला आहे. या करिता आपल्या सर्वांच्या मदतीची खूप गरज आहे. आपण सर्वांनी एकत्र येवून हा उपक्रम हाती घेतला तर अनेकांचे प्राण वाचले जातील. याकरिता आपण प्रत्येकाने आर्थिक हातभार लावला तर लवकरच आपण एक सुसज्ज रुग्णवाहिका घेवू. थोडा विचार करा आपल्या जन्मभूमी साठी आपण एकत्र येणे खूप गरजेचे आहे. 🚑🚑
रुग्णवाहिकेची अंदाजे किंमत ₹9 लाख इतकी आहे. तसेच वर्षभर चालविण्याचा काही खर्च आहे. म्हणून प्रत्येकाने देणगी देऊन सहकार्य करावे.
महिना ₹100/- प्रमाणे वर्षाचे ₹1,200/- इतकी मदत केली तरी चालेल.
Account No.309004648622
IFSC Code:RATN0000008
गूगल पे नंबर -976601225
रुग्णवाहिका संपर्क क्रमांक - 8855946946






सर्वानांच चांगले आरोग्य लाभायला पाहिजे.पण परिस्थिती ने ते सगळयांनाच लाभेल असे नाही म्हणून आधार फौंडेशन समाजातील अनाथ दारीद्र रेषेखालील असणा-या मोलमजुरी व धुणी भांडी करून कुटूंब चालविणा-या महिलांच्या व मुलींच्या आरोग्याकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे तसेच यासाठी मुलीचे रक्तगट तपासणी शिबिर, महिलांचे हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदान शिबिर यासारखी शिबिरे आयोजीत केली जातात . आपल्या शरीराची तसेच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे किती गरजेचे आहे . उत्तम व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे पण वाढती महागाई तसेच वैद्यकिय क्षेत्राचे झालेले बाजारीकरण याचा विचार केला तर गरीब लोकांना आजारी पडणे म्हणजे फार मोठी शिक्षाच आहे. यासाठी आरोग्य मेळावा अयोजीत करून विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तपासणी व मोफत औषधांची सोय करण्यात आली आहे .तसेच महिलांना व युवतींना आरोग्याच्या समस्या विषयी विविध तज्ञ उॉक्टरांचे मार्गदशन पर व्याख्याने हि आयोजीत केली आहेत .