
युवती सक्षमीकरण व महिला संरक्षण
मुलींना बाहेरील जगात वावरताना अचानक एखादा वाईट प्रसंग ओढावला तर आपले स्वसंरक्षण कसे करायचे याबाबतचे तज्ञ शिक्षकांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले जाते मुलिंना कराटे ,तायक्वांदो यासारखे स्वसंरक्षणाचे धडे देऊन युवती सक्षमीकरणाचे कामही आधार फौंडेशन रुकडीच्या माध्यमातुन श्री संदिप बनकर यांनी केले आहे .
महिलांना घरच्या घरी कांही तरी छोटे मोठे उद्योग सुरू करता यावेत व महिलांचा आर्थिक व सामाजीक दर्जा उंचावला जावा यासाठी विविध कार्यशाळा हि आयोजीत केल्या आहेत. या मध्ये कोल्हापूर येथील स्वयंसिध्दा संस्थेच्या कांचनताई परूळेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले आहे .










































उत्तम व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे पण वाढती महागाई तसेच वैद्यकिय क्षेत्राचे झालेले बाजारीकरण याचा विचार केला तर गरीब लोकांना आजारी पडणे म्हणजे फार मोठी शिक्षाच आहे. यासाठी आरोग्य मेळावा अयोजीत करून विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तपासणी व मोफत औषधांची सोय करण्यात आली आहे .तसेच महिलांना व युवतींना आरोग्याच्या समस्या विषयी विविध तज्ञ उॉक्टरांचे मार्गदशन पर व्याख्याने हि आयोजीत केली आहेत.