
उपक्रम
करुणालय बालगृह
आनंद बनसोडे व त्याच्या पत्नी यांनी सुरू केलेले पश्चिम महाराष्ट्रातील एच. आय. व्ही.बाधीत असलेल्या मुलांसाठी काम करणारे पहिले व एकमेव बालगृह आहे. या बालगृहात असणा-या मुलांकडे पाहील्यावर मन गहीवरून आले. आणि ठरवले या मुलांसाठी आपणही कांही तरी केले पाहीजे मग या मुलांसाठी दिवाळीला नविन कपडे , शाळेचे साहीत्य दिवाळीचा फराळ व मिठाई देण्यात येते . दरम्यानच्या काळात करुणालय बालगृहाच्या इमारतीचे काम सुरु होते मग संदिप बनकर यांनी समाजातील कांही दातृत्ववान आणि दानशूर लोकांना अवाहन करुन इमारतीसाठी लागणारे सिमेंट, सळी , दरवाजे यासारखे साहित्य गोळा करून श्री. बनसोडे सर यांच्या या महान आणि दैवि कार्यात खारी चा वाटा उचलला. जसजशी संस्थेची ओळख लोकांना होत होती त्या अनुशंगाने मदतीचे हात पुढे आले.


ऊस तोड कामगार मुलांना मायेची उब
दरवर्षी विदर्भ मराठवाडयातुन पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी पुष्कळ टोळया येतात. सर्व ऊसतोडणी कामगार अत्यंत हालाकीत आपले दिवस काढता असतात . दिवाळी नंतर कडाक्याची थंडी पडलेली असते या थंडीतऊस तोडणी कामगारांची सर्व मुले कुडकुडत झोपलेली असतात .हे दृष्य मनाला न पटणारे होते. मग ठरवले या मुलांना मायेची उब द्यायची आणि 2009 पासून दरवर्षी नवनि वर्षाची सुरूवात या मुलांना नविन स्वेटर वाटप करुन करायची . आणि आज अखेर हा उपक्रम न चुकता पार पाडला जातो 0 ते 16 वयाच्या मुलांना दरवर्षी नविन स्वेटर वाटप केले जातात.
गुणवंतांचा सत्कार
समाजात विविध पातळी वर मग ती शैक्षणी असो , राजकीय , समाजीक अशा प्रत्येकपातळीवर उतुंग कामगीरी करणा-या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे गरजेचे आहे. यासाठी संस्थेने नेहमी सामाजीक , राजकीय, किंवा शैक्षणीक क्षेत्रात भरीव कामगीरी करणा-या लोकांचा यथोचीत सत्कार करण्याचे काम केले आहे. 10वी,12वी किंवा स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले विद्यर्थी , अतिशय प्रतीकुल परीस्थीत काम करुन समाजासाठी काहीतरी आदर्श ठरेल असे काम करणारे लोक ,मातृदिन , बालिकादिन ,महिलादिन पर्यावरन दिन यासारखे कार्यक्रमा आयोजीत करुन अशा लोकंचे सत्कार करुन या लोकांच्या कार्याला झळाळी देण्योच काम आधार फौंडेशन रुकडीने नेहमी पूढाकार घेऊन केले आहे.


कुटूंबाना मदतीचा हात
2012 साली मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात रुकडी गावातील लक्ष्मीनगरच्या माळावर वास्तव्यास असणा-या लमाण कुटुंबावर एक मोठे संकट ओढावले. घरातील सर्व मोठे लोक कामासाठी बाहेर गेले असताना घरातील लहान मुलांनी खेळता खेळता आग लावली व बघता बघता या आगीने रौद्र रुप धारण केले आणि या आगीत जवळजवळ 4 झोपडया जळून खाक झाल्या , सर्व संसार जळुन खाक झाला. चार कुटूंबे उध्वस्त झाली. या वेळी आधार फोंडेशनने या कुटूंबाना मदतीचा हात दिला या कुटूंबाना लागणार संसारोपयोगी साहित्य व कपडे पुरवले व आपली जबाबदार पार पाडली.
आरोग्य मेळावा
सर्वानांच चांगले आरोग्य लाभायला पाहिजे .पण परिस्थिती ने ते सगळयांनाच लाभेल असे नाही म्हणून आधार फौंडेशन समाजातील अनाथ दारीद्र रेषेखालील असणा-या मोलमजुरी व धुणी भांडी करून कुटूंब चालविणा-या महिलांच्या व मुलींच्या आरोग्याकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे तसेच यासाठी मुलीचे रक्तगट तपासणी शिबिर, महिलांचे हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदान शिबिर यासारखी शिबिरे आयोजीत केली जातात . आपल्या शरीराची तसेच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे किती गरजेचे आहे . उत्तम व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे पण वाढती महागाई तसेच वैद्यकिय क्षेत्राचे झालेले बाजारीकरण याचा विचार केला तर गरीब लोकांना आजारी पडणे म्हणजे फार मोठी शिक्षाच आहे. यासाठी आरोग्य मेळावा अयोजीत करून विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तपासणी व मोफत औषधांची सोय करण्यात आली आहे .तसेच महिलांना व युवतींना आरोग्याच्या समस्या विषयी विविध तज्ञ उॉक्टरांचे मार्गदशन पर व्याख्याने हि आयोजीत केली आहेत.


दुष्काळ ग्रस्तांसाठी मदतीचा हात
सन 2014 साली विदर्भ मराठवाडयात प्रचंड दुष्काळ परिस्थीती होती . लोकांना पिण्यासाठी पाणी सुध्दा मिळणे कठीण होते. संदिप बनकर यांचे या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही असे कसे होईल या दुष्काळ ग्रस्त लोकांसाठी आपण काय करु शकतो या विचाराने संदिप बनकर यांची झोप उडाली मग ठरले या दुष्काळी भागात आपण जायचे आणि तेथील परिस्थीती जाणुन घेऊन तेथील लोकांना मदतीचा हात द्यायचा . तेथील परिस्थिती पाहण्यासाठी एक चार लोकांची कमीटी तयार केली व जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यातील मित्र समाजसेवक व धडाडीचे व्यक्तीमत्व श्री. दादासाहेृब श्रीकिसन थेटे यांच्याशी संपर्क साधुन तेथील खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेतली . मग “दुष्काळ ग्रस्तांसाठी मदतीचा हात“ हा उपक्रम हाती घेण्यात आला .या उपक्रमांतर्गत तेथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या 25 कुटुंबांना मदत करण्यात आली. या कुटुंबांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले त्यांच्या 25 मुलांना आठवी (8वी) ते बारावी (12 वी ) पर्यतच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यात आली. तेथील चार महिलांना उपजिवेकेसाठी शिलाई मशिन वाटप करण्यात आले. अशा पदधतीने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयाचे एक वेगळे ऋणाणुबंध तयार झाले.
ऑक्सीजन पार्कची निर्मीती
संदिप बनकर यांनी रेल्वेस्टेशन च्या उत्तरेस ऑक्सीजन पार्कची निर्मीती करण्याचा मानस केला आहे गेल्या तीन वर्षात 3500 देशीव 55 हुन अधिक देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली आहे. व त्यांचे संगोपनही केले आहे .आधार फौंडेशनने आजपर्यंत 4000 झाडे जगवली आहेत व 10000 हुन अधिक झाडाचे वाटप केले आहे. आधार फौंडेशन मार्फत गावंतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्त्कार असो किंवा कोणता ही कार्यक्रम असो हार तुरे यांवर खर्च न करता एक देशी प्रजाती चे झाड लोकांना भेट स्वरुपात दिले जाते ही
