ABOUT US

इतर सेवा

लाठी काठी प्रशिक्षण शिबीर

आधार फौंडेशन तर्फे आम्ही प्रथमच आपल्या मुलींच्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे व शिवकालीन युध्द कलेचे शिबीर आम्ही आपल्यासाठी आयोजित केले होते. प्रशिक्षक- शिवकालिन युध्द कला चोकाक वस्ताद कै. शिवगोंडा गं. सुतार मर्दानी आखाडा यांचेतर्फे प्रशिक्षण दिले गेले. शिक्षणाबरोबरच आपल्या मुलिंना स्वसंरक्षणाचे धडे देणे देखील तितकेच गरजेचे आहे. या शिक्षणामुळे एक नूतृत्वगुण येऊन शरीर निरोगी व सक्षम बनण्यास मदत होते.

रक्तगट तपासनी शिबीर

केवळ विद्यर्थ्यानाच नव्हे तर सामाजीक असहाय्य कुंटूंबांना अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करण्याचे काम संस्थेने केले आहे. पावसामुळे घराची पडझड झाल्याने त्यांचा कोलमडून पडलेला संसार उभा करण्यास सक्रीय सहकार्य देण्यामध्ये आधार फौंडेशन अग्रेसर आहे. व्यसनाने माण्साच्या जीवनाचे वाटेाळे होत आहे. कुटूंबातील कर्ती व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेल्याने संपूर्ण कुटूंबाची वाताहत होते. आजची तरुण पिढी गुटखा ,तंबाखू , सिगारेट आमली पदार्थ आणि दारुच्या आहारी गेल्यामुळे कॅन्सर,किडणी निकामी झालेल्या व इतर आजारांना ग्रासलेल्या 15 पेक्षाही जास्त्‍ रुग्णांना वैद्यकीय मदत संस्थे मार्फत करण्यात आली आहे .

आधारची साखरशाळा

ऑक्टोंबर –नोव्हेंबर महिण्यात दिपावलीचा सण संपला की मराठवाडयातील बीड, लातूर ,उस्मानाबाद ,परभणी या जिल्हयातून मोठया संख्येने ऊसतेाउ कामगार आपल्या मुलांबाळांसह पश्चिम महाराष्ट्रात मुख्यत्वे कोल्हापूर जिल्हयात येत असतात. या ऊसतोडणी कामगारांची मुले परीस्थीतीमुळे किंवा घरी कोणी संभाळण्यासारखे नसल्याने आपल्या पालकांच्या सोबत येतात. आणि त्यांच्या शालेय जीवनास स्वल्पविराम लागतो अशा मुलांच्यासाठी काही तरी केले पाहीजे या भावनेने आम्ही 2016/17 या वर्षी रुकडी परीसरातील ऊसतोडणी कामगारांच्यासाठी श्री. विनायक माळी (अब्दूल लाट व गद्रे काका ( इंचलकरजी ) यांचे सहकार्याने साखर शाळा सुरू केली . यावर्षी जवळ जवळ 40 मुला, मुलींना या जिल्हापरीषदेच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. या मुलांना शाळेसाठी लागणारे सर्व शालेय साहित्य् उपलब्ध्‍ करून देऊन या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचे काम आधार फौंडेशन ने केले .

जल जागृती

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट आहे. विदर्भ मराठवाडयामध्ये पाण्याची अतिशय कठीण परीस्थीती आहे सुदैवाने पश्चिम महाराष्ट्र तसा या दुष्काळाच्या सावटाखाली नाही. पण यावर्षी या पश्चिम महाराष्ट्रातही पाण्याची परीस्थीती बिकट झाली आहे. पाण्याचे महत्व् काय आहे हे समजले आहे शाहु महाराजाच्या दुरदृष्टी मुळे राधानगरी धरणाची निर्मीती झाली आणि या राधानगरी धरणामुळे या पश्चिम महाराष्ट्राला पाण्याची किंमतची राहीली नाही.पण यावर्षी अत्यल्प् पावसामुळे राधानगरी धरणही भरले नाही त्यामुळे पिके वाळली जनावरांना चारा कमी पडू लागला यामागचे खरे कारण पाण्याचा होणार अपव्यय् गरज नसतानाही शेतीला भरपूर पाणी देणे ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब न केल्यामुळे पाण्याचे नियोजन चुकले यासाठी लोकांनमध्ये जलजागृती करण्याची खरी गरज आहे जाणवले त्यामुळे यावर्षी लोंकाचे प्रबोधन करण्यासाठी जलजागृती रॅली काढण्यात आली, यावर्षी लोकांना रंगपंचमी साठी कोरडया रंगाचा वापर करण्यासाठी प्रवृत केले गावामध्ये पाँम्पलेट चिटकवून लोकांना पाण्याचे महत्व् पटवुन दिले.

कूष्टरोग आश्रमास धान्य व साहीत्य वाटप

कुष्टरोग हा आजार औषध उपचार घेऊन बरा होणारा रोग पण समाजातील लोंकाना या रोगाची इतकी भीती मनामध्ये आहे की अजही या रोगाचे एखादे लक्षण दिसू लागले की लोक घबरुन जातात त्या रोग्याला अतिशय हीन बागणुक दिली जाते तसा हा रोग पूर्ण कालबाहय् होण्याच्या मार्गावर आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कूष्टरोगी आढळुन येतात कोल्हापूर शहरात शेंडा पार्क भागात असेच एक शासकीय कुष्टरोगी वसतीगृह आहे.या वसतीगृहात 25 रुग्ण् आहेत यामध्ये वृध्द् तरुण महीला असे सर्व लोक आहेत या लोकांना आधार फौंडेशन मार्फत धान्य् बेडशिट, ब्लँकेट व जखमांना लावण्यासाठी मलम वाटप करण्यात आले या रुग्नांना हे साहीत्यवाटप करुण एक आपूलकीची उब देण्याचा प्रयत्न् आधार फौंडेशन रुकडीने केला आहे.